रत्नागिरी : ‘सत्तेत असूनही शिवसेनेला काडीचीही किंमत नाही. सरकारमध्ये शिवसेना एवढी दुर्लक्षित आहे की भाजपनं त्यांना लाभार्थीच्या जाहिरातीतही स्थान दिलं नाही.’ अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्या काल (बुधवार) सावर्डे येथे पत्रकारांशी बोलत होत्या.

‘शिवसेना हि कन्फ्युज पार्टी असून शिवसेनेने दोन्ही दगडावर पाय ठेवले आहेत. एकीकडे सत्तेमधील सर्व सोयींचा लाभ घ्यायच्या आणि दुसरीकडे विरोधकाची भूमिका घ्यायची.’ ही भूमिका शिवसेनेने बदलावी असा सल्लाही त्यांनी यावेळी शिवसेनेला दिला.

‘हिंमत असेल तर शिवसेनेने सत्ता सोडावी आणि सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरावं.’ असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, यावेळी बोलतान त्यांनी गुजरातमधील राजकारणावरही टीका केली. ‘गुजरातमध्ये अतिशय खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे. कुणाच्याही खासगी आयुष्यात डोकावण्याचा कोणालाही अधिकार नाही.’ असंही त्या म्हणाल्या.