Supriya Sule : मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) आम्ही सकारात्मक आहोत. मात्र राज्याचे सरकार हे याबाबत असंवेदनशील असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते असताना आरक्षण देतो असं सांगितलं होतं. आता त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं असेही सुळे म्हणाल्या. त्या बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांचा मान सन्मान ठेवला पाहीजे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाला बोलवावं आणि यातून योग्य तो मार्ग निघेल असंही सुळे म्हणाल्या. देशात 250 खासदार कोणाचे आहेत? मग सगळ्या बातम्या शरद पवारांच्या आजूबाजूलाच फिरतात. पवार साहेबांकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, असेही सुळे म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं होतं ते करुन दाखवावं
घटना दुरुस्ती करुन आरक्षण द्या, तुमच्याकडे बहुमत आहे. सत्ता ज्याच्याकडे आहे तो आरक्षण देऊ शकतो ना? असेही सुळे म्हणाल्या. त्यांनी प्रस्ताव आणावा आम्ही ताकतीने त्यांच्या सोबत उभे राहू असेही सुळे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच विरोधी पक्ष काळातील व्हिडिओ क्लिप सुप्रिया सुळे यांनी दाखवली. देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं होतं ते करुन दाखवावं असंही सुळे म्हणाल्या. देअर इज विल देअर इज अ वे असे फडणवीस म्हणाले होते. सत्ता फक्त घर फोडण्यासाठी आणि पक्ष फोडण्यासाठी नसते तर ही सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी असते असेही सुळे म्हणाल्या. आमचं घर फोडलं आमचा पक्ष फुटला आणि एवढं करूनही व्हिडिओ आमचाच बनवला असे सुळे म्हणाल्या. मंडल आयोगाचा रिपोर्ट सविस्तर वाचा. याबाबत संसदेत अनेकदा बोलली आहे. आमचं सरकार असतं तर आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ शकलो असतो असेही सुळे म्हणाल्या.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. जरांगे पाटील वीरेंद्र पवार यांना आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी नाही. त्यामुळे ज्या काही कायद्यात तरतुदी आहेत, त्यानुसार राज्य सरकारने पावलं उचलावीत. उद्या सायंकाळी चार वाजेपर्यंत रस्ते खाली करावेत असा महत्त्वाचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा उद्या दुपारपर्यंत खाली करावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या: