Prashant Bamb : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी काही वर्षांपूर्वी प्रामाणिकपणे काही मागण्या करत उपोषण सुरु केले होते. ज्या मागण्या होत्या त्या मान्य करण्यात आल्या आहेत. जशा जशा मागण्या मान्य होत गेल्या तसे तसे ते मागण्या बदलत गेल्याचं वक्तव्य भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी केलं आहे. मागण्यांऐवजी जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय रोष आहे हेच कळत नाही असे प्रशांत बंब म्हणाले. शरद पवार यांनी 54 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं. मराठा समाजाला काही भेटू नये हीच कृती शरद पवार यांची राहिल्याची टीका देखील बंब यांनी केली. शालिनीताईंनी मराठ्यांचा प्रश्न मांडला आणि शरद पवारांनी त्यांना पक्षातून काढून टाकल्याचे बंबं म्हणाले.
आज जे आंदोलन सुरु आहे त्यामुळे चुकीचा संदेश जातोय
कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मनोज जरांगे यांच्या मागण्या होत्या आणि नंतर आरक्षण मागितलं, ते देखील देण्यात आलं आहे. त्यानंतर आता ओबीसीतून आरक्षण मागत आहेत असे बंब म्हणाले. आरक्षणाबाबत हे सर्व सुरु झालं जेव्हा 54 मोर्चे निघाले होते. जगाने त्यांची नोंद घेतली होती. साफसफाई होत होती मोर्चे संपल्यानंतर. मात्र आज जे आंदोलन सुरु आहे त्यामुळे चुकीचा संदेश जात असल्याचे प्रशांत बंब म्हणाले.
राज्याला मनोज जरांगेंनी सांगावं पुढच्या 50 वर्षात समाज ह्या परिस्थितीतून बाहेर कसा येईल
55 ते 60 वर्ष राज्य दुसऱ्याकडे होतं. मराठा समाजाला ही पाळी का आली? असा सवाल देखील बंब यांनी केला. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील खूप कमी लोकं तेव्हा कुणबीत गेली. शरद पवार यांचेच तेव्हा राज्य होतं ना असे बंब म्हणाले. संपूर्ण राज्याला मनोज जरांगेंनी सांगावं पुढच्या 50 वर्षात समाज ह्या परिस्थितीतून बाहेर कसा येईल. मात्र, जरांगे कोणत्याच तज्ज्ञांचे ऐकत नाहीत. ते फक्त फडणवीस यांनाच दूषणे देत असल्याचे बंब म्हणाले. संपूर्ण राज्यात आरक्षण द्यावे लागते सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करावं लागतं. राज्य मागास आयोगाच्या रिपोर्टवर हे द्यावं लागतं असे बंब म्हणाले. तज्ज्ञ मंडळींना बोलवलं आणि समितीला बोलवलं अभ्यास झाला आणि त्यानंतर मागास आयोगाने रिपोर्ट दिला आणि आरक्षण मिळालं. आरक्षण तरीही 12 टक्क्यांचे मान्य झालं होतं मात्र, फडणवीस सरकार त्यानंतर राहिले नाही. सुप्रीम कोर्टात मुद्दाम शरद पवार आणि त्यांच्या टीमने डेटा दिला नाही आणि आरक्षण गेल्याचे बंब म्हणाले.
मनोज जरांगेंचे शब्द होते की 10 टक्के आरक्षण द्या
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तेव्हा पुन्हा एकदा आरक्षण मिळालं. मनोज जरांगेंचे शब्द होते की 10 टक्के आरक्षण द्या. आरक्षणही लागू केलं. सोबतच, वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या दृष्टीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी हे महामंडळ उलथवून लावलं होतं. 1998 साली मनोहर जोशींनी हे महामंडळ तयार केलं होतं असे बंब म्हणाले. आरक्षण भेटलं नाही म्हणून समाज खालवला नाही असे बंब म्हणाले.
शरद पवार यांनी कारखानेसुद्धा बरबाद केले
शरद पवार यांनी कारखानेसुद्धा बरबाद केल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला आहे. कारखाने विक्रीला काढले, परवानग्या दिल्या आणि त्यांच्याच लोकांनी त्या विकत घेतल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टी विकत घेतल्या, बॅंका आणि शैक्षणिक संस्था पवारांनीच बरबाद केल्याचे बंब म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: