मुंबई :   राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत कोर्टानं 1 ऑगस्टला पुढची सुनावणी निश्चित केली आहे. 27 तारखेला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आहे. शिवसेना आमदारांना बहुमत आहे. आम्ही कोणत्याही पक्षात गेलो नाही. आम्ही शिवसेनेतच आहे, हे प्रकरण न्यायालयीन असल्याने मला फार खोलात जायचे नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर ओबीसी आरक्षणासंदर्भात  सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निकाल एक शुभ संकेत आहे.   सरकारचा पायगुण चांगला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असेही ते या वेळी म्हणाले. 


एकनाथ शिंदे म्हणाले,  तुमच्या चार मागण्या फेटाळल्या तरी तुम्ही म्हणता आमच्या बाजूने निकाल लागला.  मंत्रीमंडळ विस्तार करायला कोणतीही अडचण नाही.  मागच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराला 40 दिवस गेले होते.  लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिमंडळ विस्ताराला कुठलीही अडचण नाही.


ओबीसी आरक्षणासंदर्भात आम्हाला क्रेडिट नको 


राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.  एक मोठा महत्वाचा निर्णय झाला आहे. आम्ही सातत्याने बांठीया आयोगाशी  संपर्कात होतो. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही दिल्लीत या कामासाठी तीन वेळा गेलो.  ओबीसी आरक्षणासंदर्भात आम्हाला क्रेडिट नको आहे. आज जे श्रेय घेत आहे ते बांठीया आयोगाच्या विरोधात होते.  


नविन सरकारचा पायगुण चांगला 


आज ओबीसी आरक्षण सुनावणी झाली. त्यात बांठीया आयोगाचा अहवाल आज स्विकारला.  हा ओबीसी समजाचा विजय आहे, त्यांच्या न्याय हक्काचा प्रश्न होता. आरक्षण मिळवून देण्याच्या जो शब्द दिला होता तो आम्ही पाळला. नविन सरकारचा पायगुण चांगला आहे. हा एक शुभसंकेत मानायला हरकत नाही