नवी दिल्ली : पुण्यातील सहारा समुहाची अॅम्बी व्हॅली ही टाऊनशीप जप्त करण्याचे आदेश देऊन सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाला मोठा दणका दिला आहे. सहारा समुहाने 14 हजार 779 रुपयांची थकबाकी लवकरात लवकर जमा करावी, यासाठी सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

अॅम्बी व्हॅली ही पुण्यामध्ये सहारा समुहाने विकसीत केलेली प्रसिद्ध टाऊनशिप आहे. अॅम्बी व्हॅलीवर गंडांतर येऊ नये यासाठी सहारा समुहानं सर्वोतोपरी प्रयत्न केले होते. सहारा समुहाच्या ज्या मालमत्ता कर्जासाठी गहाण ठेवलेल्या नाहीत, त्याची यादी 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

थकबाकीची वसुली करण्यासाठी त्या संपत्तीचा लिलाव होण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत सहाराने 11 हजार कोटींची थकबाकी भरली असून, उर्वरीत थकबाकीची रक्कम जमा करण्यासाठी जुलै 2019 पर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला होणार आहे.