नागपूर : नागपुरात शिवसेनेच्या 30 ते 40 उमेदवारांपर्यंत बी फॉर्म न पोहोचल्याने त्यांना शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाशिवाय निवडणूक लढवावी लागणार आहे.


मात्र, ऑनलाईन सर्व्हर डाऊन करुन भाजपने ही खेळी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे भाजपविरोधात शिवसेना आता निवडणूक आयोगाकडे तक्रारही करणार आहे.

आमचे 115 बी फॉर्म पोहोचले आहेत. 15 उमेदवार आम्ही पुरुस्कृत केले. तर भाजपचे 15 उमेदवार शिवसेनेत येणार आहे. परंतु या मंडळींना आमचे बी फॉर्म पोहोचू नयेत, म्हणून यासाठी भाजपने जाणीवपूर्वक ऑनलाईन सर्व्हर डाऊन केला. त्यांना अडवण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी केला आहे.

नागपुरात सर्व 151 जागा लढवण्याचं शिवसेनेचं स्वप्न होतं. पण, बी फॉर्म वेळेत न मिळाल्याने शिवसेनेचं हे स्वप्न भंग झालं. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.