नागपूर : पांढरकवडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टी-1 (अवनी) या वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी विकास खरगे आणि इतर आठ जणांना नोटीस बजावल्या आहेत. ह्या नोटीस प्रकरण दाखल करून घेण्याच्या आधीच्या किंवा ज्याला नोटीस बिफोर अॅडमिशन म्हणतात त्या आहेत.
खरगेंसह प्रधान मुख्य वनसंवर्धक वन्यजीव ए के मिश्रा ह्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. अवनी वाघिणीने यवतमाळ जिल्ल्यात 2017-18 मध्ये धुमाकूळ घातला होता. 13 व्यक्तींची शिकार या अवनी वाघिणीने केली असल्याचा आरोप होता. ज्यामुळे त्या परिसरात प्रचंड दहशत होती आणि वाघिणीला मारावे अशी मागणी तिथल्या लोकांची होती. त्यावेळी विकास खरगे हे वन विभागाचे सचिव होते. सर्वोच्च न्यायालयात संगीता डोगरा ह्या वन्यजीव अॅक्टिव्हिस्टने जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी अवनीच्या शिकारीसाठी देण्यात आलेला मोबदला आणि त्यानंतर केलेला सर्व जल्लोष हा कोर्टाने ह्यात आधी दिलेल्या निर्णयाचा अवमान असल्याचे म्हटले आहे.
वन विभागाने अवनीला बेशुद्ध करून पकडण्याचे ही प्रयत्न केले होते. मात्र ते असफल होते. शिकारी नवाब शफथ अली खान ह्याच्याशी करार केला. अवनीला नवाबचा मुलगा असगर अली ह्याने गोळी घालून मारले होते. ह्या सर्वावरच बरेच वादळ उठले होते.
संबंधित बातम्या :