पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघातावर (Pune Porcshe Car Accident)  शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  गप्प का आहेत?, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी केला आहे. यावर सुप्रिय सुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, या प्रकरणात फोन कोणी केला. वकिल कोणी पाठवला याची चौकशी झाली पाहिजे. राजकीय दबाव कोणी टाकला? कोणामुळे बेल झाली? याचे उत्तर फडणवीसांन दिले पाहिजे.


पुणे अपघातावर पुण्याच्या पालकमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही या विषयी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या,  पुण्याचे पालकमंत्री याची आणि माझी ही आनेक दिवस भेट झाली नाही. इंदापुरची दुर्घटना झाली. बारामतीची अतिवृष्टी  झाली, याचा पाठपुरावा मी महाराष्ट्र सरकारकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे. याचे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले पाहिजे.


विरोधी पक्षात असणाऱ्यांना प्रश्न विचारणे हा अतिशय बालिशपणा : सुप्रिया सुळे


जे सत्तेत आहे. ज्यांच्याकडे खाते आहे. ज्यांच्या राजकीय दबावामुळे मुलाला बेल मिळाली. ते विरोधी पक्षात असणाऱ्या मला प्रश्न विचारत आहेत. हा अतिशय बालिशपणा आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


गलिच्छ सरकार आजपर्यंत मी पाहिले नाही : सुप्रिया सुळे


दोन  लोकांचा जीव गेला. हे निंबध लिहायला लावतात. ही क्रूर चेष्ठा आहे. हा सरकराचा असंवेदनशील आणि हालगर्जीपणा आहे. इतका गलिच्छ सरकार आजपर्यंत मी पाहिले नाही, अशी टीका देखील सुप्रिया सुळेंनी केली आहे.  ⁠धंगेकर यांनी बोलले की देवेंद्र फडणवीस दिशाभूल करत आहे याची शक्यता नाकारता येणार नाही. ⁠हा दबाव कोणी टाकला याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. ⁠आम्ही लोक प्रतिनिधी असताना सर्व आयकार्ड दाखवतो तर मग याला बारमध्ये का प्रवेश दिला? ⁠अल्पवयीन असताना गाडी का दिली?असा सवाल उपस्थित केला आहे.


 सुरक्षेच्या संदर्भात सरकार गंभीर नाही: सुप्रिया सुळे


डोंबिवली ब्लास्टविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुरक्षेच्या संदर्भात सरकार गंभीर नाही.  ⁠याआधी ही अशाच घटना घडल्या होत्या. 


नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल


पुण्यातील कल्याणी अपघातावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे गप्प का आहेत?, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय. तसेच अगरवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का?, असाही सवाल नितेश राणेंनी केलाय. तसेच आरोपीचे वकील शरद पवारांचे निकटवर्तीय असल्याची माहिती मिळतेय, असही नितेश राणे म्हणालेत.