पुणे : काल रात्री पुण्यातील कॅप भागातील फॅशन स्ट्रीटला आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी पुणे कॅन्टॉनमेंट आणि पुणे महापालिकेचे अग्निशमन दल प्रयत्न करत होते. पहाटे आग विझल्यानंतर कॅन्टॉनमेंट अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश हसबे हे दुचाकीवरुन त्यांच्या लोहगाव भागातील घरी जाण्यासाठी निघाले. मात्र वाटेत एका चारचाकी वाहनाची त्यांच्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते 54 वर्षांचे होते. 


राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्वीट करुन हसबे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनिल देशमुख म्हणतात की, "पुण्याच्या कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटवर असलेल्या रेडीमेड कपड्याच्या शेकडो दुकानांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे पुणे कॅन्टोनमेंट फायर ब्रिगेडचे अधीक्षक प्रकाश हसबे यांचा कर्तव्य बजावून घरी परत जात असताना रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. हसबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखा





त सहभागी आहोत."


 


पुणे शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये  रात्री 11 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. फॅशन स्ट्रीटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे या परिसरातील आग काही क्षणांत पसरली. आगीच्या ज्वाळा उसळलेल्या पाहायला मिळत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.


आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं तर आग नेमकी कशाने लागली याची मिळालेली नाही. आगीच कपड्यांची दुकानं असलेल्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे.


महत्वाच्या बातम्या :