बाळासाहेबांची सेना वाघांची होती, आता ती शेळ्यांची झाली: सुनील तटकरे
एबीपी माझा वेब टीम | 26 May 2016 02:32 AM (IST)
जालना: 'शिवसेना दुटप्पीपणे वागत असून एकीकडे मंत्रीपदाचा लाल दिवा घेऊन फिरते तर दुसरीकडे सरकारचेच वस्त्रहरण करत असते. बाळासाहेबांची शिवसेना वाघांची होती आता ती शेळ्यांची कशी झाली हेच कळत नाही.' अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. ते काल जालन्यात आयोजित दुष्काळी परिषदेत बोलत होते. जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दुष्काळी परिषदेचं आयोजन करण्यात आल होतं. यावेळी जालना जिल्ह्यातील 143 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 हजार रूपये मदतीच्या धनादेशाचे तटकरेंच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पक्ष कार्यकार्त्यांसह शेकडो शेतकरी या परिषदेसाठी उपस्थित होते. दरम्यान, तटकरेंनी केलेला टीकेला सेना काय उत्तर देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.