महिलांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या कुरिअर बॉयला मनसे कार्यकर्त्यांकडून चोप
एबीपी माझा वेब टीम | 25 May 2016 05:33 PM (IST)
ठाणे : महिलांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. ठाण्याच्या खोपट भागात ही घटना घडली आहे. मागील काही दिवसांपासून कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या या तरुणाकडून महिला आणि विद्यार्थिनींना अश्लील मेसेज येत होते. परंतु बदनामी होईल या भीतीने या महिला पोलिसांकडे तक्रार करत नव्हत्या. मात्र प्रकरणाची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाली आणि मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला चोप दिला. मनसे कार्यकर्त्यांनी या तरुणाला कान पकडून महिलांची माफी मागण्यास भाग पाडलं. चोप दिल्यानंतर त्याला राबोडी पोलिसांच्या ताब्यात दिलं. यानंतरही असा प्रकार कोणी केला तर त्यालाही असंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसे पदाधिकारी विश्वजित जाधव यांनी दिला आहे. पाहा व्हिडीओ