कर्जमाफीसाठी सरकारकडे दानत नाही, असे म्हणत तटकरेंनी शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याची मागणी केली. शिवाय, तूर खरेदी केंद्र सुरु करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही तटकरेंनी यावेळी दिला. त्याचवेळी, भाजप सरकारच्या काळात शेतकरी अडचणीत असल्याची टीका सुनील तटकरेंनी सरकारवर केली.
शेतकऱ्यांच्या समस्यांसह राज्यातील विविध प्रश्नांना अजेंडा बनवत विरोधकांनी एकत्र येऊन संघर्ष यात्रेला चंद्रपुरातून पहिल्या टप्प्याची सुरुवात केली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुलडाण्यातील सिंदखेड राजा येथून सुरुवात झाली होती.
विरोधकांनी दोन्ही टप्प्यात सत्ताधारी पक्षावर जोरदार घणाघात करत आवाज उठवला. आता तिसऱ्या टप्प्यात विरोधक किती आक्रमक होतात आणि सरकारचा विरोधकांना कसा प्रतिसाद असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.