नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांची तूर आली, ती खरेदी करण्यात यावी, बाहेरुन येणाऱ्या तुरीवरील इम्पोर्ट ड्युटी 10 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांवर करावी आणि तूर खरेदीसाठी ठोस धोरण आखावं, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
रामविलास पासवान यांच्याशी भेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांही ही माहिती दिली. मात्र केंद्र सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मागणीला कसा प्रतिसाद दिला आहे, ते अद्याप समजू शकलेलं नाही.
22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांना टोकण मिळालेले आहेत, त्यांची तूर खरेदी केली जाईल. मात्र ज्यांच्याकडे टोकण नाहीत, त्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनाच तूर विकावी लागणार आहे.
व्यापाऱ्यांकडे 4 हजार रुपये प्रति क्विंटल दराने तूर खरेदी केली जाते. तर सरकारकडून नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर 5 हजार 50 रुपये प्रति क्विंटल दराने तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत तूर नाफेडच्या केंद्रांवर आणता आली नाही, त्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
कोणत्या बाजार समितीत किती तूर शिल्लक?
- अमरावती – अचलपूर बाजार समितीत 40 हजार क्विंटल खरेदी झाली आहे. तर 25 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.
- सोलापूर – माढा बाजार समितीत 19 हजार 700 क्विंटल तूर खरेदी झाली आहे. तर 5 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.
- लातूर – लातूर, चाकूर, जळकोट बाजार समित्यांमध्ये 75 हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. तर 20 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.
- उस्मानाबाद – बाजार समितीमध्ये 32 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटल तूर शिल्लक.
- अहमदनगर – बाजार समितीमध्ये 2 लाख 7 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. 25 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- नांदेड – बाजार समितीमध्ये 1 लाख 12 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 20 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- जालना – बाजार समितीमध्ये 1 लाख 42 हजार 665 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 29 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- धुळे – बाजार समितीमध्ये 29 हजार 794 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 400 क्विंटल तूर शिल्लक.
- नंदुरबार – बाजार समितीमध्ये 28 हजार 405 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 4 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- बीड – बाजार समितीमध्ये 2 लाख 80 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटल तूर शिल्लक.
- अकोला – सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून आतापर्यंत 2 लाख 58 हजार 388 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर शिल्लक.
- वर्धा – जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून 1 लाख 14 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर शिल्लक.
- यवतमाळ – जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून 1 लाख 32 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 3 लाख 75 हजारांपेक्षा जास्त तूर शिल्लक
संबंधित बातम्या :