India Weather Update : उत्तर भारतात हळूहळ तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, बिहारमध्ये पुन्हा एकदा हवामान बदलले आहे. तर पश्चिम हिमालयात देखील  पाऊस पडणार असून, बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, महारष्ट्रात देखील उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेल्यानं उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे.



महाराष्ट्र


रज्यात तपमानात बदल होत आहे. राज्यातील तापमान हे 30 अंशाच्या पुढे गेले आहे. तर काही जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. अकोला, सोलापूर, अहनदनगर, सांगली, परभणी, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 35 अंशाच्या पुडे गेला आहे. 



दिल्ली


बुधवारपासून दिल्लीत हवामानात बदल झाला आहे. दिल्लीत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मध्येच खूप हलका सूर्यप्रकाश पडू शकतो. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 27 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीतील हवामान असेच राहणार आहे. दरम्यान, आज आणि उद्या दिल्लीत पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. दिल्लीत आज कमाल तापमान 27 अंश, तर किमान तापमान 15 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


राजस्थान


राजस्थानच्या हवामानात देखील चढ-उतार सुरूच आहेत. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल तसेच काही ठिकाणी हलका पाऊस पडम्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढचे काही दिवस असेच वातावरण राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तापमानात वाढ होत आहे. आज राजस्थानमध्ये कमाल तापमान 29 आणि किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.


बिहार


राज्यातील आग्नेय आणि ईशान्येकडील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 25 ते 26 अंश, तर किमान तापमान 14 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


पंजाब


पंजाबमध्ये येत्या तीन दिवस ढगांच्या आच्छादनासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच वाराही मध्यम वेगाने वाहू शकतो. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस राहील. त्याचवेळी, किमान तापमान 11 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.


जम्मू आणि काश्मीर


जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेला पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 2 मार्चपर्यंत पाऊस आणि बर्फवृष्टीपासून दिलासा मिळणार नाही. आज श्रीनगर, काश्मीरमध्ये कमाल तापमान 6 आणि किमान तापमान 2 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आज जम्मूमध्ये कमाल तापमान 19 आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.


उत्तराखंड


उत्तराखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. आज राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान 1 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 11 अंश सेल्सिअस राहील.


हिमाचल प्रदेश


हिमाचल प्रदेशमध्ये आदल्या दिवशी बर्फवृष्टी आणि पावसामुळे अनेक रस्ते आणि वीज ट्रान्सफॉर्मर ठप्प झाल्याचे दिसले. त्याचबरोबर आजही हवामान असेच राहील. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 8 अंश तर किमान तापमान -1 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: