नागपूर :  प्रत्येक उन्हाळ्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या शहरात तापमानाचा उच्चांक गाठतात. दरवर्षी गेल्या वर्षीच्या  तापमानान एक दोन अंश सेल्सिअसने वाढ नोंदवलीले, असते. मात्र यंदाच्या उन्हाळ्याने मागील तीस वर्षाचा विक्रम मोडला आहे. विदर्भातील या वर्षीचा उन्हाळा हा सर्वात थंड उन्हाळा म्हणून नोंदवला गेला आहे.


मे महिन्यात सरासरी विदर्भाचे तापमान 42.1 अंश सेल्सिअस असते.  मात्र यावर्षी हे सरासरी तापमान 39.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. या वर्षी विदर्भात फक्त दोनच दिवस अकोल्याचे तापमान 45 अंश सेल्सिअसच्यावर गेले होते.  बहुतांश दिवस विदर्भाचे तापमान हे 40 ते 42 अंश सेल्सियाच्या घरात होते. नागपूर, चंद्रपूर सारख्या शहराचे तापमान या वर्षी 45 अंश सेल्सिअसच्या खालीच राहिले. नागपूर मध्ये या वर्षी फक्त एक दिवस 14 मे ला सर्वोच्च 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे  


पावसाची अधूनमधून  हजेरी उन्हाची तीव्रता कमी होण्याचे मुख्य कारण


 विदर्भात सर्वाधिक तापमान आतापर्यंत हे 2007 साली चंद्रपूर मध्ये 49 अंश सेल्सिअस नोंदविले गेले तर नागपूरचे सर्वाधिक तापमान 2013 मध्ये 47.9 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.  ऐन उन्हाळ्यात विदर्भातील जवळपास  सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. विदर्भात पहिल्यांदा उन्हाळ्यात नद्या दुथडी भरून वाहत होत्या. तर काही ठिकाणी पूरसदृश परिस्थितीही निर्माण झाली होती. अवकाळी पावसाने अधूनमधून  हजेरी उन्हाची तीव्रता कमी होण्याचे हे मुख्य कारण ठरले.


यंदाच्या उन्हाळ्यात संपूर्ण विदर्भातच  ऊन - पावसाचा खेळ


ग्लोबल वॉर्मिंगमुळे देखील वातावरणावर विपरित परिणाम होत आहे.  मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या तिन्ही महिन्यांमध्ये अवकाळी पावसाने विदर्भात हजेरी लावली.  यंदाच्या उन्हाळ्यात संपूर्ण विदर्भातच  ऊन - पावसाचा खेळ राहिला. त्यामुळे काही दिवसांचा अपवाद वगळता यंदा विदर्भातील नागरिकांना उन्हाळा जाणवलाच नाही


विदर्भातील उन्हाची लाट मुख्यत्वे राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांवर अवलंबून


विदर्भातील उन्हाची लाट मुख्यत्वे राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांवर अवलंबून असते. कोरडे वातावरण असेल तरच उष्णलाट येऊन तापमानात वाढ होते. या उन्हाळ्यात ते चित्र पाहायला मिळाले नाही. विदर्भात जरी उन्हाळा जाणवला नाही तरी राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा जाणवला आहे. काही ठिकाणी तर उष्माघाताने बळी घेतला.


हे ही वाचा :