सांगली: कोल्हापूरच्या धर्तीवर एकरकमी एफआरपी देण्याचा सांगली जिल्ह्यातील साखर कारखानादारांनी मान्य केले असून उद्याचे चक्काजाम व बंद आंदोलन स्वाभिमानीकडून स्थगित करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानादारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीची रक्कम, पहिली उचल म्हणून एकरकमी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये एकमत झाल्याने अखेर ऊस दराची कोंडी फुटली आहे. त्यामुळे सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात होणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन देखील मागे घेण्यात आले आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील आंदोलनावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असल्याचे सांगण्यात आले होते.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानादारांची बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूरच्या धर्तीवर एकरकमी एफआरपी देण्याचा सांगली जिल्ह्यातील साखर कारखानादारांनी मान्य केले आहे. यामुळे उद्याचे चक्काजाम व बंद आंदोलन स्वाभिमानीकडून स्थगित करण्यात आले आहे.
सांगलीतील चक्काजाम आंदोलनही स्वाभिमानीकडून स्थगित
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Nov 2018 08:44 PM (IST)
कोल्हापूरच्या धर्तीवर एकरकमी एफआरपी देण्याचा सांगली जिल्ह्यातील साखर कारखानादारांनी मान्य केले असून उद्याचे चक्काजाम व बंद आंदोलन स्वाभिमानीकडून स्थगित करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानादारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -