Kolhapur News :  कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळलं आहे. दत्त दालमिया साखर कारखान्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कारखाना समर्थकांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. ऊस वाहतूक रोखून दाखवाच अशी धमकी देत कारखाना समर्थक शेतकऱ्यांच्या अंगावर धावून गेल्यानंतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्ते आणि कारखाना समर्थकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाल्याचं पाहायाल मिळालं. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप वेळीच हस्तेक्षप केला. 

Continues below advertisement

एफआरपीची मोडतोड करून कारखाना सुरू केल्याने शेतकरी संघटनेने संपूर्ण ऊस वाहतूक रोखली

दत्त दालमिया साखर कारखान्याने एफआरपीची मोडतोड करून कारखाना सुरू केल्याने शेतकरी संघटनेने संपूर्ण ऊस वाहतूक रोखली आहे. यावेळी कारखाना समर्थकांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं पुन्हा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याची पाहायला मिळालं. 

कर्नाटकात उसदरासाठी सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश, प्रती टन 3300 दर जाहीर

कर्नाटकात उसदरासाठी सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून सरकारने उसाला प्रती टन 3 हजार 300 रुपया इतका दर जाहीर केला आहे. ऊस दर जाहीर झाल्यावर बेळगाव जिल्ह्यातील गुर्ला पूर येथे सुरु असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत  चालले होते. दोन मंत्र्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. शुक्रवारी सायंकाळ पर्यंत ऊस दर जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अखेर आज मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली बंगळुरु येथे बैठक झाली आणि दर जाहीर करण्यात आला. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले होते. दोन मंत्र्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ऊस दर जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अखेर आज मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली बंगळुरु येथे बैठक झाली आणि दर जाहीर करण्यात आला आहे.

Continues below advertisement

उसाला 3751 रुपये दर देण्याची मागणी

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येवून 3400 ते 3450 पर्यंत पहिली उचल देत आहेत .सदरची उचल आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत केलेल्या 3751 रूपयाबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होवून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिले आहेत. सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांचेसोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढावी, अशी आमची अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार व कारखानदार या मुद्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.