मुंबई : राज्यातील 5 सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर NCDC कडून मंजूर झालेली 594 कोटी रुपयांपैकी 487 कोटी रक्कम खात्यावर जमा झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साखर कारखानदारांना  मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील एकूण  11 सहकारी साखर कारखान्यांना 1590.16 कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यापैकी 5 कारखान्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली असून उर्वरित कारखान्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


कोणत्या कारखान्याला किती मदत? 


1. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्याच्या खात्यावर 219 कोटी जमा .


2. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या किल्लारी सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 18 कोटी रुपये जमा.


3. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार मानसिंग नाईक यांच्या विश्वासराव सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 53 कोटी रुपये जमा.


4. वाळव्याच्या नाईकवडी यांच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 121 कोटी रुपये जमा. 


5. श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याला  74 कोटी रुपये जमा.


घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर नंतर निर्णय 


पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघाचे आमदार अशोकबापू पवार यांच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात दोन दिवसापूर्वी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे एनसीडीसीकडून मंजूर असलेल्या 594 कोटी रुपयांपैकी 107 कोटी रुपये रक्कम राज्य सरकारने राखीव ठेवली आहे. यासंदर्भातली पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर या रकमेचा निर्णय घेण्यात येईल. 


राज्यातील 11 कारखान्यांना मदत 


राज्यातील 11 कारखान्यांना 1590 कोटी 16 लाखांची थकहमी देण्यात येणार आहे. पहिल्या यादित 13 कारखान्यांना 1898 कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नव्याने आदेश काढत 11 कारखान्यांना 1590.16 कोटी रुपयांची थकहमी देण्याचा शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला. 


एनसीडीसीने थकहमी दिलेले कारखाने (रक्कम कोटीत)


- लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना (धारूर, बीड) : 97.76  कोटी 


- श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा  : 94 कोटी


- वृधेश्वर सहकारी साखर कारखाना , पाथर्डी : 93  कोटी


- लोकनेते मारुतीराव घुले पाटील सहकारी साखर कारखाना , नेवासा   : 140 कोटी  


- किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना,  वाई : 327 कोटी 


- किसनवीर खंडाळा सहकारी साखर कारखाना, खंडाळा : 150 कोटी 


- अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले : 94 कोटी


- श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर : 327 कोटी 


- श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, उमरगा : 94 


- अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई : 80 कोटी 


- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा : 103.  40 कोटी