'शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकांवर टीका-टिपणी करु नये. शिवसेनेने टीका करायला नको. एकमेकांवर टीका करणं अयोग्य आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो', असं मतही मुनगंटीवारांनी व्यक्त केलं आहे.
'काँग्रेस-राष्ट्रवादीने अशाचप्रकारे एकमेकांवर टीका केली होती, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. सेना-भाजपने आपापसात टीका टाळायला हवी', असं आवाहन मुनगंटीवारांनी केलं. गेल्या आठवड्यात बैठक झाली असून पुढील आठवड्यात यासंबंधी पुन्हा बैठक होणार
आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
'शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हा स्तरावर निर्णय होतो, मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपची इच्छा आहे. युतीबाबत शिवसेनेची कुठलीही अट मला समजलेली नाही', असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.