चंद्रपूर : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) लंडनमधील वाघनखं (Wagh Nakh) भारतात कधी येणार? याबाबत ट्विटरवरुन सुधीर मुनगंटीवारांना (Sudhir Mungantiwar) खोचक सवाल करत निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. आमचा प्रयत्न हा शिवरायांची जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी सुरु आहे. त्या प्रयत्नांना देखील यश येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाघ नखे आणि जगदंबा तलवार असा एकत्रित कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे. आमच्या विरोधी पक्षनेत्याला काही काम शिल्लक राहिलं नसावं. त्यांनी एक फोन केला असता तरी, त्यांना मी माहिती देऊ शकलो असतो. मात्र किती खाली जाऊन राजकारण करायचं याचा आदर्श ते घालताय. अशा शब्दात सुधीर मुनगंटीवारांनी विजय वडेट्टीवारांच्या त्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.


नेहरूंच्या कार्यकर्त्यांची या संदर्भात काय भावना असू शकते


आमच्या विरोधी पक्षनेत्याला काही काम शिल्लक राहिलं नसावं. विजय वडेट्टीवारांना आपल्या भागातील रस्त्यांसाठी फोन करता येतो. त्यांचप्रमाणे त्यांनी जर एक फोन केला असता, तर मी त्याना सगळी माहिती देऊ शकलो असतो. मात्र, किती खाली जाऊन राजकारण करायचं याचा आदर्श ते घालताय. या रिकाम्या कामांमुळे काँग्रेसला मायक्रोस्कोपनी पाहावं लागेल. त्यांच्यासाठी वाघनखं हा विषय गौण आहे. कारण नेहरूंच्या कार्यकर्त्यांची या संदर्भात काय भावना असू शकते, हे लक्षात येतं. अशा शब्दात सुधीर मुनगंटीवारांनी विजय वडेट्टीवार टोला लगावला आहे.  


काही लोकांचं पोट का दुखतं याचं आश्चर्य


छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघनखं ही भारतात आणली जात आहे. आपल्या जाज्वल्य इतिहासातील अमूल्य ठेवा मायभूमीत परत यावा ही देशाच्या तमाम नागरिकांची इच्छा आहे. हे स्वप्नवत कार्याला यश देखील आले आहे. मात्र असे असतांना काही लोकांचं पोट का दुखतं याचं आश्चर्य आहे. येत्या 13 जानेवारीपासून आम्ही राज्याभिषेकाचा मोठा प्लान तयार केलाय. आमचा प्रयत्न शिवरायांची जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी सुरु आहे. कदाचित त्या प्रयत्नांना देखील यश येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही वस्तूंचा एकत्रित कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे. असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 


पावनगड अतिक्रमण कारवाई 


धर्मांध आणि तुष्टीकरण करणारे लोकं याला धार्मिक रंग देतात. गड-किल्ल्यांच्या बाबतीत तरी हा भाव ठेवू नका. निवडणूक जिंकण्यासाठी इतर मार्गाचा अवलंब करा. हिंदू मंदिरांची देखील अतिक्रमणं हटवली जातात, त्यात नवल काय. त्यामुळे पावनगडावरील अनधिकृत कारवाई ही नियमांना धरून आहे. असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 


हेही वाचा :