रायगड:  गुजरातचा (Gujrat)  महाराष्ट्रवर डोळा आहे. जाती जातीत भांडण लावली जात आहेत. मराठी माणूस एकत्र राहू नयेत यासाठी बाहेरचे प्रयत्न करत आहेत. आज ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे ते पाहता, महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही, नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे, असा इशारा मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray)  दिला आहे. राज ठाकरेंच्या हस्ते मनसे सहकार शिबिराचं उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. 


राज ठाकरे म्हणाले, गुजरातचा महाराष्ट्रवर डोळा आहे. आपली महानंदा डेअरी अमूल गिळंकृत करते का असा प्रश्न उभा आहे.  सहकर चळवळ सांभाळायला अनेक ग्रेट माणसे आहेत. इतिहासाकडून शिकले पाहिजे. वर्तमान हातून निघून जाईल. मराठवाड्यात विहिरीला 800-900  फूट पाणी नाही. साखर कारखाने उभा करून ऊस लागवड होते, पाणी जास्त लागते.  पाणी खेचल्यास मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार असे तज्ञ सांगत आहेत पण आम्हाला फरक पडत नाही . जमीन बरबाद होत आहे. वाळवंट झाल्यास ती जमीन पूर्ववत करायला 400 वर्ष लागतील.


 जमिनीचा तुकडा गेल्यास तुमचं अस्तित्त्व संपेल: राज ठाकरे


जाती जतीत भांडण लावली जात आहेत. मराठी माणूस एकत्र राहू नयेत यासाठी बाहेरचे प्रयत्न करत आहेत. इथल्या लोकांना कळत नाही महाराष्ट्रामधील सर्व चांगले बाहेर काढा नसेल निघत तर उद्ध्वस्त करा. घराच्या जमिनीचा तुकडा हे तुमचे अस्तित्व आहे. जगातील सर्व युध्द जमिनीसाठी झाली. भुगोलाशिवास इतिहास पूर्ण होत नाही. युद्ध म्हणजे जमिन ताब्यात घेणे ती लढवून घेतली जाते. पुर्वी लढाया तरी होत होत्या. आता कळत सुद्धा नाही आपल्या जमिनी गुपचुप विकत घेतलेल्या शिवडी न्हावा शिवा सागरी मार्गाच्या आजीबाजूची जमीन गेली आहे.  रायगडमध्ये हीच परिस्थिती होणार आहे.  बाहेरचे लोक जमिनी विकत घेणार ती माणसं आली की मराठी बोलायचे बंद होणार आहे.  रायगड जिल्ह्याला मोठा धोका सतर्क राहा,  जमिनी घालवू नका, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.  


पालघर , ठाणे , रायगड हातातून जात आहे, कोकण किनारपट्टीला मोठा धोका: राज ठाकरे


राज ठाकरे म्हणाले,  विरोधातील ही सहकार चळवळ सुरू आहे. आपले नेते लाचार , मिंदे झाले, पैशाने वेडे झाले आहेत  त्यांना कळत नाही. कुठून कुठे जातात.. घरच्यांचा पण कळेना आज कुठे आहेत  त्यांनी त्यांची मने गहाण टाकली आहेत. माझा सैनिक स्वभिमान गहाण टाकणार नाही. पालघर , ठाणे , रायगड हातातून जात आहे.  कोकण किनारपट्टीला मोठा धोका आहे.  महाराजांनी सांगितले होते, आपला शत्रू समुद्रामार्गे येईल,  समुद्रावर गस्त वाढवा. आपल्याकडे शत्रू समुद्रामार्गे आले.


आत्ताचं सरकार ही सहकार चळवळ नाही तर सहारा चळवळ, राज ठाकरेंचा टोला


राज ठाकरे म्हणाले,  माणसाला धंदा जमत नाही असे बोलतात पण असंख्य मराठी माणसे करोडोंचे व्यवसाय करतात पण गप्प असतात. शोबाजी करत नाही. जगातील प्रसिद्ध परफ्यूमचा अर्क हे ठाण्यातील केळकर बनवतात. आपली ताकद खुप मोठी आहे. राज्यात सहकार चळवळ उभी राहिली आहे.  आताचे सरकार ही सहकार चळवळ नाही ती सहारा चळवळ आहे.  महात्मा जोतीबा फुले यांनी सहकार चळवळ उभी केली. जमिनी श्रीमंताच्या घशात जावू नयेत म्हणून जोतीबांनी पहिले आंदोलन केले.