नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी मंगेश चितळे महापालिकेचे नवे उपायुक्त असतील, अशी आधीच घोषणा झाली होती. मात्र, आयुक्त कोण असतील, याबाबत उत्सुकता होती. अखेर सुधाकर शिंदे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल नगरपालिका ते पनवेल महापालिका
देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळख असेलल्या पनवेल नगरपालिकेची स्थापना 25 ऑगस्ट 1852 रोजी झाली. वाढत्या शहरीकरणामुळे पनवेलचं आता महापालिकेत रुपांतर करण्यात आले आहे. खरंतर महापालिका करण्याची मागणी गेल्या 25 वर्षांपासूनची होती. मात्र, अखेर पनवेलकरांच्या मागणीला न्याय मिळाला. राज्यातील 27 वी आणि रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून पनवेल ओळखले जाणार आहे.
पहिला दिवस कसा असेल?
महापालिकेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींची कागदपत्रे पहिल्या दिवशीच महापालिकेकडे सोपवली जातील. कारण आता ग्रामपंचायती संपुष्टात येऊन सर्व भाग महापालिका क्षेत्रात येईल. ग्रामपंचायती कार्यलये, कर्मचारीही महापालिकेकडे हस्तांतरित होतील.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोणता परिसर येणार?
नवीन महापालिकेमध्ये नगरपालिका, पनवेल तालुक्यातील 29 गावं, तळोजा एमआयडीसी परिसर समाविष्ट होणार आहे.