लातूरहून परभणीकडे निघालेल्या शिवशाही बसच्या खालच्या बाजूकडून अचानक पिवळा धूर निघू लागला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. MH 06 BW 890 या क्रमांकाची लातूर आगाराची ही शिवशाही बस होती.
ही शिवशाही बस लातूर येथील अंबाजोगाई रोडवर असलेल्या नवीन बसस्थानकाच्या प्रवेश द्वारामधून बाहेर पडत होती. याच वेळी चालकाच्या बाजूने बसच्या खालच्या भागातून पिवळा धूर निघून लागला आणि मोठा आवाज सुरू झाला.
चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने गाडी जागीच थांबवली आणि आतील प्रवासी घाबरुन बाहेर आले. यात अंबाजोगाईचेही अनेक प्रवासी होते. यावेळी बाहेर पडलेल्या प्रवाशांना स्फोट वगैरे होतो की काय अशी भीती वाटू लागली होती, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
दरम्यान, यापूर्वीही शिवशाही अंबाजोगाई आगाराच्या शिवशाही बसचं पुढचं चाक 6 मे रोजी अचानक फुटलं होतं. मध्यरात्री ही घटना झाली आणि त्यानंतर एसटी महामंडळाकडून कोणतीही मदत देण्यात आली नव्हती, ज्यामुळे प्रवाशांना संपूर्ण रात्र रस्त्यावर काढावी लागली.
संबंधित बातमी :