शिर्डी/अहमदनगर : नोटाबंदीनंतर अनेक डोळे विस्फारुन टाकणाऱ्या घटना उजेडात येत आहेत.  अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्येही असाच एक प्रकार घडला आहे. एका  तरुणाच्या बँक खात्यात अचानक तब्बल साडे पाच कोटी रुपये जमा झाले आणि काही क्षणात त्यापैकी पाच कोटी आणि काही लाख रुपये गायबही झाले आहेत.


आता त्या खात्यावर 5 लाख 55 हजार रुपये शिल्लक आहेत. स्वप्नील बोरावके असं या तरुणाचं नाव आहे. यानंतर बँकेने या तरुणाचं खातं सील केलं आहे. मात्र एवढी रक्कम या तरुणाच्या नावावर कुणी टाकली, याबाबत सगळ्यांना प्रश्न पडला आहे.

नोटाबंदीनंतर यापूर्वी देखील देशभरात खात्यावर अचानकपणे मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पंजाब, हरियाणा, दिल्ली या ठिकाणी या घटना घडल्या आहेत. मात्र राज्यात अशी घटना होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.