सातारा : मुलीची हत्या केल्याच्या आरोपातून तिच्या कुटुंबियांनी आरोपी राहत असलेल्या वस्तीवर हल्ला केल्याची घटना साताऱ्यातील चिंचनेर वंदनमध्ये घडली आहे. यात 30 घरांमध्ये तोडफोड झाली आहे. तर काही घरं जळून खाक झाली आहेत.


या गावात राहणाऱ्या मृत तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पण कुटुंबियांनी तरुणीचे परस्पर लग्न लावलं. काही दिवसांपूर्वी या तरुणाने तरुणीला भेटण्यासाठी ठोसेघरला बोलावले आणि तिची हत्या केली.

या हत्येप्रकरणी तरुणाला अटक झाली. परंतु संतापलेल्या मुलीच्या कुटुंबियांनी थेट आरोपीच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यात पोलिसांच्याही दोन मोटरसायकलींसह 15 गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणी 30 जणांना अटक केली असून आज सातारा बंदचे आवाहनही करण्यात आलं आहे.