लातूर : लातूरच्या शाहू महाविद्यालयाचे 180 विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. विशेष बाब म्हणजे यातील बारा विद्यार्थी 99 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे यावर्षी पहिल्यांदाच जेईई मेन्स परीक्षा ही दोन फेजमध्ये घेण्यात आली. त्यापैकी पहिल्या फेजचा निकाल जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर झाला होता तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दुसऱ्या फेजचा निकाल काल सोमवारी रात्री उशिरा NTA कडून जाहीर करण्यात आला. या निकालाद्वारे NEET, IIIT, CGFTI या ठिकाणच्या प्रवेशासोबतच जेईई अॅडव्हान्स परीक्षेची पात्रताही जाहीर करण्यात अली आहे.
यासाठी पर्सेटाइल निकालासोबतच विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक (AIR) जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेद्वारे देशभरातून साधारणपणे 2.5 लाख विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. बहुतेक विद्यार्थ्यांनी दोन्हीही फेजमधील जेईई मेन्स परीक्षा दिल्या होत्या व त्यापैकी तुलनात्मक सर्वोत्तम असणाऱ्या एकूण पर्सेंटाईल गुणांवर विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक देण्यात आले आहेत.
या परीक्षेत राजर्षी शाहू जुनिअर सायन्स कॉलेज आणि संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी संस्थेचे 180 विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचा परम जितेंद्र राठौर हा विद्यार्थी ९९. ९० टक्के गुणांसह देशात १३१४ तर OBC -रँकिंगमध्ये १८० सह संस्थेमधून प्रथम आला आहे. अंजली आत्माराम कारमुडे ९९. ८० टक्के गुणांसह देशात २११६ वी तर OBC रँकिंगमध्ये देशात ३१७ सह संस्थेत दुसरी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. ऋषिकेश रामकृष्ण कनामे ९९. ६४ टक्के गुणांसह देशात ४३२८ OBC -रँकिंगमध्ये ७२२ सह संस्थेत तिसरा आला आहे आणि अनुसूचित जमाती संवर्गातून आशिष अनिल चितळे ९७. ०१ टक्के गुणांसह देशात २३० व्या क्रमांकावर तर संस्थेतून या संवर्गातून प्रथम आला आहे आणि अनुसूचित जाती संवर्गातून विजयकुमार बळवंत गायकवाड हा विद्यार्थी देशात १९८१ व्या क्रमांकावर तर संस्थेतील संबंधित प्रवर्गातून प्रथम आहे
याशिवाय १२ विद्यार्थी ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे, ५४ विध्यार्थी ९५ पेक्षा अधिक परसेन्टाइल गुण घेणारे आणि ९८ विद्यार्थी ९० पेक्षा अधिक परसेन्टाइल गुण घेणारे आहेत. यावर्षी खुल्या संवर्गासाठीचा ऍडव्हान्स परीक्षेचा कटऑफ ८९.७४ परसेन्टाइल ओबीसी संवर्गासाठी ७४.३१ ईड्ब्लूएस ७८.२१ एस सी ५४.०१ तर एस टी संवर्गासाठी ४४.३३परसेन्टाइल ठेवण्यात आला आहे.
लातूरच्या शाहू महाविद्यालयाचे 180 विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
01 May 2019 12:04 AM (IST)
लातूरच्या शाहू महाविद्यालयाचे 180 विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -