Pune New Invention News : इर्शाळवाडी असो, केदारनाथ असो की अन्य (Pune New Invention News)  दुर्गम भाग असो. अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर सरकारला ही बाब कळायला बराचसा वेळ जातो. त्याहून अधिकचा वेळ ते घटनास्थळ शोधण्यात जातो. दुर्गम भाग असल्यानं तिथं तातडीची मदत पोहचवता-पोहचवता काही तास उलटतात. अशावेळी दुर्घटनेतून काही जीव बचावण्याची शक्यता असते त्यांना ही प्राण गमवावे लागतात. ही वेळ यंत्रणांवर येऊ नये यासाठी आणि ही सगळी आव्हानं पेलण्यासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एक पर्याय शोधला आहे. त्यांनी मानव विरहीत विमान (Aircraft) विकसित केलं आहे. चेन्नईमध्ये पार पडलेल्या ड्रोन डेव्हलपमेंट चॅलेंज स्पर्धेत हे विमान भारतात अव्वल ठरलं आहे. तर लवकरच जागतिक स्पर्धेत हे विमान उड्डाण घेणार आहे.



पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विध्यार्थ्यांनी मानव विरहीत विमान विकसित केलं आहे. संपूर्णपणे हे भारतीय बनावटीचे आहे. आपत्कालीन परिस्थिती जेव्हा दुर्गम भागात निर्माण होते, तेव्हा तिथं तातडीनं मदत पोहचवता येत नाही. अशावेळी हे मानव विरहित विमान बचावकार्यात महत्वाची भूमिका बजावू शकतं. 


संकल्पना कशी सुचली, कसं साकारलं विमान?


अनेकदा दुर्गम अनेक अपघात घडतात. या भागात पोहचणं कठिण होतं. याच भागात योग्यवेळी मदत मिळावी म्हणून हे विमान तयार करण्यात आलं आहे. आमची 24 जणांची टीम आहे. सगळ्यांचे विचार जुळले आणि त्याचवेळी एक स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. याच स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्ही विमानाची निर्मिती केली. थेअरीचा अभ्यास करुन योग्य गणितं जुळवून आणि त्याचं योग्य डिझायनिंग करुन हे विमान तयार करण्यात आलं आहे. सात विविध पातळ्यांवर अभ्य़ास करुन हे विमान तयार करण्यात आलं असल्याचं इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अनिकेत पिंगळे आणि मिहीर झांबरे सांगतात.


मानव विरहित विमान भारताचा डंका विदेशात वाजवणार?


नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत हे विमान भारतात एक नंबर ठरलंय, जी अभिमानाची बाब आहे. पुढे जागतिक स्पर्धेत ही हे विमान उड्डाण घेणार आहे. सोबतच प्रत्यक्षात हे बचावकार्यात उतरावं म्हणून ही प्रयत्न केले जात आहे. या सगळ्या  प्रोजेक्टचं अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे आणि मेकॅनिकलच्या विभागाचे प्रमुख  डॉ. पद्माकर देशमुख यांच्याकडून कौतुक होत आहे. या प्रोजेक्टसाठी विद्यार्थ्यांनी तीन वर्श प्रचंड मेहनत घेतली आहे त्यामुळे हे मानवविरहीत विमान देशात अव्वल आलं आहे.  जागतिक स्पर्धेत हे मानव विरहित विमान भारताचा डंका नक्कीच वाजवेल. पण या मानव विरहित विमानाचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला कसा करून घेता येईल. या दृष्टीने भारत सरकारने विचार केल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशाची गगन भरारी मिळू शकेल.


इतर महत्वाची बातमी-


Safety Pin : रोजच्या वापरात येणारा 'सेफ्टी पिन'चा शोध कोणी लावला? वाचा सेफ्टी पिनची रंजक कथा...