बुलडाणा : फ्रेण्डशिप डे निमित्त मित्रांसोबत सेल्फी काढण्याचा अतिउत्साह एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला आहे. बुलडाण्यात सेल्फी काढताना झाडावरुन पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.


 
बुलडाणामध्ये राहणारा ऋषिकेश शंकर डुकरे हा विद्यार्थी मित्रांसोबत फ्रेण्डशिप डे साजरा करण्यासाठी गिरोडा येथे गेला होता. फ्रेण्डशिप डे ची आठवण म्हणून मित्रांसोबत त्यांनी झाडावरुन सेल्फी घ्यायचं ठरवलं.

 
अतिउत्साहाच्या भरात ऋषिकेशने झाडावर चढून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी झाडाची फांदी तुटली आणि तो दरीत डोक्यावर पडला. डोक्यावर आदळल्याने ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला.