सांगलीत बलात्कार पीडितेची आरोपीच्या घरातच आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 07 Aug 2016 11:55 AM (IST)
सांगली : बलात्कार पीडित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. आरोपीच्या शेतातील घरात गळफास घेऊन पीडितेने आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी पीडितेने चिठ्ठी लिहिली आहे. त्याचप्रमाणे भिंतीवरही आरोपीचं नाव लिहिलं आहे. आरोपीवर कारवाई होत नसल्याच्या विवंचनेतून पीडित महिलेने आत्महत्या केल्याची माहिती आहे. आरोपीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पीडित महिलेवर पोलिसांनी काल खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या त्रासाला कंटाळूनच तिने आयुष्य संपवल्याची माहिती आहे.