नागपूर : कोणत्याही विद्यार्थ्याचा जात प्रमाणपत्राअभावी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी प्रवेश रद्द केला जाणार नाही, असं समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी स्पष्ट केलं आहे. विधान परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
आमदार हेमंत टकले यांनी विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे प्रवेश रद्द केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
जात पडताळणीअभावी कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झाला नसून सर्वोच्च आणि उच्च न्यायलयाच्या आदेशाने प्रवेशासाठी निवड यादी प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती दिलीप कांबळे यांनी दिली.
अनेकदा विद्यार्थी वेळेत जात प्रमाणपत्र सादर न करु शकल्याने प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे दिलीप कांबळे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.