नागपूर : 'विनाकारण नागपूरला टार्गेट करु नका, नागपूरमध्ये मोठी गुंतवणूक येत आहे त्यामुळे तुम्ही नागपूरला बदनाम करत आहात. यामुळे गुंतवणूक परत जाईल.' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये गुन्हेगारीत घट होत असल्याचा दावा केला आहे. ते कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सभागृहात बोलत होते.


'नागपूरवर विरोधकांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे नागपूरला बदनाम केलं जात आहे. पण आता नागपूरमधील गुन्ह्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. तसेच नागपूरमधील कायदा सुव्यवस्थेबाबतचा सर्व्हेच मी पटलावर ठेवणार आहे.' असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

'2012-13शी तुलना केली तर सध्या राज्यात गुन्हेगारीच्या घटना कमी झाल्या आहेत.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा केला.

‘मुन्ना यादववर कारवाई होईल’

मुख्यमंत्र्यांनी मुन्ना यादवच्या प्रश्नावरही सभागृहात उत्तर दिलं. 'मुन्ना यादव जर गुन्हेगार असेल तर त्याच्यावर कारवाई नक्कीच होईल. तो फरार असेल तर पोलीस त्यांची कारवाई करतील. त्यामुळे मी त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप चुकीचा आहे. त्यामुळे मुन्ना यादव जेव्हा सापडेल तेव्हा त्याला अटक केली जाईल.' असंही ते म्हणाले.

देव गायकवाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, यावेळी देव गायकवाड प्रकरणीही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'देव गायकवाड प्रकरणातील व्यक्तीचं खरं नाव महादेव बालगुडे असं आहे. तो बारामतीचा राहणारा आहे. त्याने जी आक्षेपार्ह पोस्ट लिहली होती आणि ती ज्यांनी शेअर केली होती त्यांना नोटीस धाडण्यात आली होती. ज्यामध्ये एका पत्रकाराचाही समावेश आहे.' असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरील आकडेवारी सादर

‘राज्यातील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे. महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात वरच्या क्रमांकावर गेला आहे. अशी विधानं केली गेली. म्हणून मला आकडेवारीत उत्तर द्यावं लागत आहे. खरं तर हा विषय आकडेवारी देऊन मांडायचा नसतो.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गुन्ह्यांविषयींची आकडेवारी सादर केली.

- खून १३.४९ टक्के घट

- बलात्कार ३.६ टक्के घट

- दरोडे २.४६ टक्के घट

- दंगल - ३.१५ टक्के घट

- सोनसाखळी चोरी - ८.९० टक्के घट

- फक्त चोरीच्या घटनेत वाढ, ती देखील मोबाईलची. यापूर्वी मोबईल हरवल्यात नोंद व्हायची. ती आता चोरीच्या घटनेत होते. म्हणून ही वाढ झाली आहे.

------------

- दखलपात्र गुन्ह्यात देशात राज्याचा १३ वा क्रमांक

- खुनात देशात १६ वा क्रमांक

- बलात्कारच १५ वा क्रमांक

------------

- २००८ पासून गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण ८ टक्के होतं

- 2015 साली ते प्रमाण ३२.९९ टक्के आणि आता ३४.०८ टक्के झालं आहे.

------------

- महिलांविरोधातील गुन्हात घट  झाली आहे.

- फक्त विनयभंगाच्या प्रकरणात वाढ झाली आहे. ती देखील छेडछाडीमुळे. कारण आपण छेडछाडीची नोंद विनयभंग म्हणून करतो.

------------

- 3786 बलात्कारातील आरोपी, यातील 37 41 ओळखीचे, तर ४१ अनोळखी आहेत, म्हणजेच ओळखीच्या लोकांनी बलात्कार करण्याचे प्रमाण ९८.८१ टक्के आहे.

------------

- अनुसूचित जाती विरोधात २०१३ साली १६३४ गुन्हे, २०१७ साली १३८५

- अनुसूचित जमाती विरोधात २०१३ साली ४४४ तर २०१७ साली ३७१ गुन्हे

------------

- बालकांवरील अत्याचारात घट झाली आहे.

- १२.३६ टक्के घट आहे

- पण अपहरण व पळवून नेलेल्या मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे.

- २०१५ ते जुलै २०१७ पर्यंत २०११२ मुले शोधून घरापर्यंत पोहचवण्यात आली आहेत.

------------

पोलीस कोठडी मृत्यू

2013 साली 35 जणांचा कोठडीत मृत्यू झाला.

2014 साली 41 जणांचा कोठडीत मृत्यू झाला.

2015 साली 38 जणांचा कोठडीत मृत्यू झाला.

2016 साली 38 जणांचा कोठडीत मृत्यू झाला.

2017 साली 12 जणांचा कोठडीत मृत्यू झाला.

------------

-नागपूरमधील गुन्ह्यांमध्ये सातत्याने घट होत आहे

- खुनाच्या गुन्ह्यात घट  - ३

- दरोडे  - १६

- बलात्कार - ६

- विनयभंग - १६

- अपहरण - १२

संबंधित बातम्या :

मुन्ना यादव नागपुरातील फार्म हाऊसवरच, विखे-पाटलांचा गौप्यस्फोट

नागपूर पोलिसांना आरोपी मुन्ना यादव सापडेना!

नागपुरातील भाजप नेते मुन्ना यादव यांची CID चौकशी सुरु

स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीत धिंगाणा, मुन्ना यादवांच्या मुलांवर गुन्हा