नवबौध्दांनाही अल्पसंख्यांकांचा दर्जा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2017 12:06 AM (IST)
राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील सुमारे 50 लाख नवबौध्दांना अल्पसंख्यांकांच्या सुविधा मिळाणार आहेत.
मुंबई : नवबौध्द समुदायातील व्यक्तींना आता बौध्द समाजाप्रमाणं अल्पसंख्यांकांच्या सुविधा मिळाणार आहेत. राज्य सरकारनं हा महत्वपूर्ण निर्णय़ दिला आहे. राज्यात सुमारे 50 लाख नवबौध्द आहेत. त्या लोकांना हा लाभ मिळणार आहे. 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात अनेकांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली. अशा अनुयायांना नवबौध्द संबोधलं जातं. नवबौद्धांना यापूर्वी अल्पसंख्यांकांना मिळणाऱ्या सुविधा मिळत नव्हत्या. मात्र, आता राज्य सरकारच्या निर्णयानंतर त्यांना या सुविधा मिळणार आहेत.