VIDEO : शेतकऱ्यांना बोगस म्हणणारा मंत्री बोगस : अजित पवार
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2017 08:07 PM (IST)
‘शेतकऱ्यांना बोगस म्हणणारा मंत्रीही बोगस आणि त्याचा पक्षही बोगस.’ अशी घणाघाती टीका करत अजित पवारांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला.
सोलापूर : ‘सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याची प्रवृत्ती म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे.’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते आज (गुरुवार) सोलापूरमध्ये बोलत होते. याचवेळी शेतकऱ्यांना बोगस म्हणणाऱ्या भाजप नेत्यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. ‘शेतकऱ्यांना बोगस म्हणणारा मंत्रीही बोगस आणि त्याचा पक्षही बोगस.’ अशी घणाघाती टीका करत अजित पवारांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला. सोलापूरमध्ये झालेल्या राष्ट्रावादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवारांनी सरकारवर सडकून टीका केली. जेवढ्या वेगानं सरकार वर गेलं तेवढ्याच वेगानं सरकार खाली येणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. ‘लोकांमध्ये मिसळून सरकारची उदासिनता लक्षात आणून द्या.’ असं आवाहन अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं. VIDEO : संबंधित बातम्या : 10 लाख शेतकरी बोगस, त्यांनाच कर्जमाफीचे फॉर्म भरताना अडचणी: चंद्रकांत पाटील