मुंबई : केंद्राच्या ‘उडान’ योजनेत राज्यातील आणखी पाच शहरांचा समावेश करा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. अमरावती, गोंदिया, शिर्डी, रत्नागिरी आणि  सिंधुदुर्ग शहारांचा या योजनेत समावेश करा, अशी मागणी करण्यात आली आहे.


या पाच शहरांच्या समावेशाची मागणी

  1. अमरावती

  2. गोंदिया

  3. शिर्डी

  4. रत्नागिरी

  5. सिंधुदुर्ग


नुकत्याच जाहीर झालेल्या उडानच्या नव्या मार्गांमध्ये जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नाशिक या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. अवघ्या अडीच हजार रुपयांमध्ये या हवाई सफरीचा नागरिकांना आनंद घेता येणार आहे.

https://twitter.com/mygovindia/status/848040288660496384

देशांतर्गत हवाई वाहतुकीचं जाळं तयार करण्यासाठी केंद्राने मोठं पाऊल उचललं आहे. ‘उडान’ प्रकल्पाला चालना देण्यात येणार असून, यात 128 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

निवडक विमान कंपन्या या मार्गावर स्वस्तातील हवाई प्रवासी सेवा लवकरच सुरु करणार आहेत. या माध्यमातून 70 विमानतळे जोडणार आहेत. देशातील 20 राज्यांमधून ‘उडान’ची सेवा सुरु केली जाणार आहे.