गडचिरोली : मागील महिन्यात नक्षलवाद्यांशी लढताना दोन जवानांना विरमरण आले होते. या शहिदांच्या कुटुंबियांची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली. राज्य सरकार शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची त्यांनी ग्वाही दिली. शहीद जवानाच्या पोलीस जवानाच्या पत्नीला मिळणारी मदत विभागून मातापित्यांना मिळावी या प्रस्तावावर विचार होणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी गृहमंत्र्यांनी प्राणहिता पोलीस मुख्यालयात शहीद स्मृती समृद्धी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात भेट दिली. मागील महिन्यात पोलीस नक्षल चकमकीत शहीद झालेल्या पोलीस जवानाच्या कुटुंबीयांशी त्यांनी संवाद साधला. 17 मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यात असलेल्या पुयारकोटी-कोपरशी जंगल परिसरात सकाळी नक्षलविरोधी अभियान राबविले जात असताना पोलीस-नक्षल यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांनी केलेल्या कटाचा गडचिरोली पोलीस दलाच्या जलद प्रतिसाद पथकाने धाडसी मुकाबला केला. यात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने व पोलीस शिपाई किशोर आत्राम यांना वीरमरण आले होते.
Corona Updates | महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 82,968 वर ; आज 2234 रुग्ण कोरोनामुक्त
शहिदांच्या कुटुंबियांशी गृहमंत्र्यांचा संवाद
गृहमंत्री देशमुख यांनी प्राणहिता पोलीस मुख्यालयात पोचताच शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. यासोबतच त्यांनी या चकमकीत प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या धाडसी पोलीस जवानांशी थेट संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले. माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह त्यांनी शहीद जवान किशोर आत्राम यांची पत्नी-माता व बहीण यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. राज्यशासन शहीद कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहीद जवानाला मिळणारी मदतीची रक्कम विभागून मातापित्यांना ही मिळावी असा प्रस्ताव सादर केला आहे. राज्य शासन यावर सकारात्मक विचार करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
#CORONA खासगी रुग्णालयांचे 80% बेड्स कागदावरच,रुग्णांना खाटा मिळत नाही हे वास्तव-देवेंद्र फडणवीस