राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडून 8 जुलै 2019 रोजी जारी झालेल्या पत्रकात नमूद केलं आहे की, "1 जानेवारी 2019 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 9 टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात यावा. तसंच महागाई भत्त्याची वाढ 1 जुलै 2019 पासून रोखीने देण्यात यावी."
"1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या सहा महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश दिले जातील," असं या पत्रकात नमूद करण्यात आलं.