1. दिल्लीत आज राजकीय खलबतांचा दिवस, भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक तर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा, सोनिया गांधी नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन करणार


2. मनसे अध्यक्ष राज ठाकरे-सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खलबतं, तर ईव्हीएमविरोधात राज ठाकरे आक्रमक

3. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरेही पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करणार, सूत्रांची माहिती, एकादशीचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे सर्व खासदारांसह विठ्ठल रखुमाईचरणी

4. मुंबई-कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा, तुफान पावसाने मुंबईकरांची दैना, पांडवकडा धबधब्याचा ओढा फुटल्याने सायन-पनवेल महामार्ग जलमय

5. मुख्यमंत्र्यांच्या आवाहानंतर राज्यभरातील रिक्षा चालकांचा आजचा राज्यव्यापी संप मागे, तर मुंबईतील बेस्ट बसचा प्रवास आजपासून स्वस्त, किमान भाडं पाच रुपये



6. मोबाईल चोराचा पाठलाग करताना धावत्या लोकलमधून उडी, 52 वर्षीय प्रवाशाचा त्याच ट्रेनखाली येऊन मृत्यू, चर्नी रोड स्टेशनवरील थरारक घटना

7. झारखंडमधील तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख करत टिक टॉकवर व्हिडीओ, मुंबईतील पाच तरुणांवर गुन्हा, टिक टॉक अकाऊंटही सस्पेंड

8. मुंबईच्या वाहतूक कोंडी आणि गर्दीवर उतारा शोधण्याचा प्रयत्न, मालाड ते मार्वे आणि बोरीवली ते गोराई दरम्यान एमएमआरडीए रोप वे प्रकल्प उभारणार

9. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेचा बीए अभ्यासक्रमात समावेश, विद्यापीठ प्रशासनाकडून मात्र बोलण्यास नकार

10. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज टीम इंडियाचा सामना विल्यमसनच्या न्यूझीलंडशी, मॅन्चेस्टरमध्ये किवीजवर मात करुन चौथ्यांदा फायनल गाठण्यास भारत उत्सुक