बजेटशिवाय 5 हजार कोटी द्या, राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2017 11:34 PM (IST)
मुंबई : राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे 5 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. सर्वसामान्य बजेट व्यतिरिक्त 5 हजार कोटी द्यावेत अशी मागणी राज्य सरकारनं केली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली. केंद्राच्या बजेटआधी सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक दिल्लीत पार पडली. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. भाजपनं निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी आणि इतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं. मुंबईतील अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प, छत्रपती शिवाजी स्मारक, स्वस्त दरातील घरं, व्याघ्र संरक्षण आणि नक्षलग्रस्त भाग यासाठी निधीची मागणी करण्यात आली.