मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मला 100 दिवस पूर्ण झाले. मोदी सरकारच्या कामकाजावर लोक किती समाधानी आहेत, यासाठी एबीपी न्यूज आणि सी वोटरने सर्व्हेतून लोकांची मतं जाणून घेतली. मोदी सरकारच्या कामाचा राज्यातील राजकारणावर काय परिणाम होईल, याबाबतही या सर्व्हेत आढावा घेण्यात आला.
या सर्व्हेत राज्यातील सरकारच्या कामगिरीबाबतही लोकांना विचारण्यात आली. महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर सर्व्हेत सहभागी झालेल्या लोकांपैकी 37.1 टक्के लोक 'खूप समाधानी' असल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर 37.2 दोन टक्के लोक 'खूप समाधानी' आहेत, असं या सर्व्हेतून समोर आलं आहे. विरोधी पक्षाच्या कामगिरीवरही लोकांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विरोधी पक्षाच्या कामगिरीवर 24.8 टक्के लोक 'खूप समाधानी' आहेत. एबीपी न्यूज आणि सी वोटरने ऑगस्ट महिन्यात 11 हजार 308 लोकांचा हा सर्व्हे केला.
महाराष्ट्र सरकारच्या कामावर तुम्ही किती समाधानी आहात?
खूप समाधानी - 37.1
काही प्रमाणात समाधानी - 29.8
मुळीच समाधानी नाही - 24.7
माहित नाही/सांगता येत नाही - 8.4
-----------------------------------
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर तुम्ही किती समाधानी आहात?
खूप समाधानी - 37.2
काही प्रमाणात समाधानी - 33.3
मुळीच समाधानी नाही - 21
माहित नाही/सांगता येत नाही - 8.5
------------------------------------
राज्यातील विरोधी पक्षनेत्यांच्या कामगिरीवर तुम्ही किती समाधानी आहात?
खूप समाधानी - 24.8
काही प्रमाणात समाधानी - 22.5
मुळीच समाधानी नाही - 27.7
माहित नाही/सांगता येत नाही - 25.1
------------------------------------
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपला यश मिळेल?
होय - 76.3
नाही - 2.6
भाजपला तोटा होईल - 2.9
माहित नाही/सांगता येत नाही - 18.3