नागपूर : राज्य निवडणूक आयोगानं आज निवडणुका जाहीर केल्या. यात दोन टप्प्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. मात्र यावेळी राज्य निवडणूक आयोगानं नागपूर जिल्हा परिषद नागपूर जिल्हा परिषद वगळली आहे.
का वगळली नागपूर जिल्हा परिषद?
पारशिवनी आणि वानाडोंगरी हे जिल्हा परिषद मतदार संघ होते. मात्र जिल्हा परिषद रोस्टर निघाला आणि त्यानंतर राज्य सरकारने या दोन्ही जिल्हा परिषदांना नगर परिषद आणि नगर पंचायत घोषित केलं.
राज्य सरकारच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. निवडणुकीला सहा महिन्यापेक्षा कमी वेळ उरला असताना असा शासन निर्णय करता येत नाही असं आव्हान देणाऱ्याचं म्हणणं आहे.
जिल्हा परिषदांचे मतदान दोन टप्प्यात होणार
पहिला टप्पा :
पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांचा समावेश- औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली
पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषद 165 पंचायत समित्या. 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी नामनिर्देशन पत्र भरणे, 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार
दुसरा टप्पा :
दुसऱ्या टप्प्यात- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली जिल्हा परिषद (4 पंचायत समित्या)
दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्हा परिषद व 118 पंचायत समित्यांसाठी नामनिर्देशन पत्र 1 ते 6 फेब्रुवारी पर्यंत भरता येतील. 21 फेब्रुवारी रोजी मतदान