मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचारी होते. शिवाय परिवहन मंत्री अनिल परबही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर एसटी संपावर तोडगा निघालेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे नियुक्त्या रखडलेल्या एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, एसटी कर्मचार्यांच्या विविध समस्यांबाबत आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी सुद्धा चर्चा केली. फार काळ संप सुरू राहणे चांगले नाही, त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून या समस्या निकाली काढाव्यात, आम्ही मदत करू
गोपीचंद पडळकर म्हणाले, जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोवर आम्ही माघार घेणार नाही. काल एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे
सरकार निलंबनाची भीती दाखवत आहे. आजच्या बैठकीत फडणवीस यांनी कशा पद्धतीने तोडगा निघू शकतो याचे मार्गदर्शन अनिल परब यांना केले आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत संप मिटणार नाही. या कर्मचाऱ्यांचा घात शरद पवार यांनी केला आहे.
एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
कोरोनामुळे नियुक्त्या रखडलेल्या एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. 2019 साली सरळसेवा भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या चालक तथा वाहक आणि सहाय्यक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारची नियुक्त्या रखडलेल्या कर्मचाऱ्यांना संधी देण्याची तजवीज सुरू असल्याची माहिकी 'एबीपी माझा'ला एसटी महामंडळातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे स्पष्ट संकेत अनिल परब यांनी दिले आहे.
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
संबंधित बातम्या :