Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. एसटी सुरळीत चालू झाली का मग एसटी कर्माच्याऱ्यांवर कारवाई चालू करा हा सरकारचा दुतोंडीपणा आणि दुटप्पीपणा कामगाराच्या विरोधातली सरकारची भूमिका आज सभागृहात उघड करणार असं पडळकरांनी सांगितलं. त्रिसमितीय अहवाल आणि गोपनीयतेच्या पत्राची होळी केली असंही पडळकरांनी सांगितलं आहे. राज्य सरकारला दोन्ही सभागृहात धारेवर धरणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर पडळकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 'कर्मचाऱ्यांना कामावर हजर व्हा असं सांगता आणि माधव काळे हा या प्रकरणातला सचिन वाझे आहेत तो गोपनीयतेचे पत्र पाठवतो हे अजित पवारांनी माहिकी नाही का?', असा सवाल पडळकरांनी प्रश्न अपस्थित केला आहे.


शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एसटी कामगारांच्या संघटना होत्या. ज्या मान्यता प्राप्त संघटनेचे नेतृत्व पवार साहेब करत होते. जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं ते एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे असं पवार साहेबांचे भाषण आहे आणि त्यांच्या संघटनेचा मोर्चा होता. आता कर्मचारी त्यांच्यापासून बाजूला गेला. न्यायालयाने मान्यता प्राप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची मान्यता रद्द केली. त्यामुळे पवारांची परिस्थिती अशी झाली आहे. त्यांना आता एसटी कर्मचाऱ्यांना काढून मग खाजगी भरती करायची आहे आणि यामध्ये घोटाळा करायचा आहे, असा गंभीर आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.




पुढे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. यावेळी पडळकर म्हणाले की, 'अजित पवारांच्या शब्दाला राज्यामध्ये काडीचीही किंमत राहिलेली नाही. याआधी विजेच्या प्रश्नावर सुद्धा अजित पवार मोठ्यामोठ्याने सभागृहात बोलले होते. मी सभागृहात बोलत असल्यापासून या राज्यातल्या एकाही शेतकऱ्यांचं कनेक्शन कट केला जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी परत ऊर्जामंत्री सांगितलं बिल भरा नाहीतर कनेक्शन कट. यावरून कळत की अजित पवारांच्या शब्दाला काडीची किंमत राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी आता मोठेपणा करणं बंद करावं.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha