बीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च-2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. बीड जिल्ह्याचा यंदा 91.24 निकाल लागला आहे. यंदा निकालाचा टक्का घटला आहे. त्याबरोबरच काही विद्यार्थ्यांचे चकीत करणारे निकाल समोर आले आहेत. माजलगाव तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्याने सर्वच विषयात 35 गुण मिळवत स्वत:कडे सार्‍यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.


धनंजय नारायण नखाते असे या 35 टक्के गुण घेणार्‍या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील मजुरीचे काम करतात. धनंजय हा माजलगाव तालुक्यातील उमरी येथील रामेश्‍वर विद्यालयातील विद्यार्थी आहे. मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत धनंजयने सर्वच 6 विषयात काठावरचे म्हणजेच 35 गुण मिळवले आहेत. त्याला एकूण 500 गुणांपैकी 175 गुण मिळाले आहेत. योगायोग म्हणा की, शिक्षण मंडळाकडून दिला जाणारा ग्रेस या माध्यमातून त्याला प्रत्येक विषयात 35 गुण मिळालेत. सहाजिकच इतके तंतोतत गुण कोणत्याही विद्यार्थ्याला मिळत नाहीत. मात्र धनंजयचा बुधवारी निकाल हाती आला तेव्हा सर्वच विषयात 35 चा आकडा दिसला. तेव्हा अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. दरम्यान धनंजय नखाते या विद्यार्थ्याचे शार्दूलेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव सोंळके, मुख्याध्यापक पोगावाड, सुरेश इनामकर यांनी अभिनंदन केले आहे.



संबंधित बातम्या