SSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC 10th Result 2022) आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. तर 3.06 टक्के विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत. परंतु, नापास झाल्यानंतर विद्यार्थींनी निराश होऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे. "दोन वर्षे मी जेलमध्ये राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये गेलो नाही आणि तुम्हाला ऑनलाईन शिक्षणामुळे डिप्रेशन येतं का? असा प्रश्न विचारत डिप्रेशन न घेता अभ्यास करण्याचा सल्ला छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच नाशिकमध्ये उभारले जाणार आहे. आज त्याचा भूमिपूजन सोहळा दिंडोरी तालुक्यातील शिवनई गावात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थी आणि विद्यापिठाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज लागलेल्या निकालाचा धागा पकडत छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जेलमधील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. दोन वर्षे मी जेलमध्ये राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये गेलो नाही. मग तुम्हाला ऑनलाईन शिक्षणामुळे डिप्रेशन येत का? डिप्रेशन न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले, "24 जून 2013 ला उपकेंद्राबाबत निर्णय घेण्यात आला होता. पण नंतर दुसरे सरकार आल्याने ते काम थांबले होते. मात्र, आता आमचे सरकार परत आल्याने हे काम पूर्णत्वास जात आहे."
छगन भुजबळ यांनी यावेळी भाजपवर देखील निशाणा साधला. देशात आज वाईट परिस्थिती आहे. पण ताई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आहेत. जाऊद्या आता मी काही बोललो तर ताईंची अडचण होईल असा टोलाही त्यांनी भारती पवार यांना लगावला आले.
"मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना मुमं, छगन भुजबळांना अन्नपू मंत्री आणि उदय सामंत यांना उशीतशी असे शॉर्ट कटमध्ये म्हणतात असं म्हणतात, असा विनोद देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केला. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI