मुंबई: दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आधी परीक्षेचा फॉर्म भरावा, पैसे भरण्याची मुदत आम्ही वाढवू, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे, परीक्षा फी भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याबाबतची तक्रार बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली होती.

त्याबाबत विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देताना, शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरावा, पैसे भरण्याची मुदत राज्य सरकारच्या मदतीने वाढवून देणार आहोत, त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना नोटांच्या अडचणीमुळे बसता येणार नाही असं होणार नाही, असं सांगण्यात आलं.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने घेण्यात आलेला हा निर्णय आहे.