मुंबई: आज दहावीचा निकाल जाहीर झाला. राज्याचा निकाल तब्बल 89.56 % लागला. अनेक विद्यार्थ्यांना घसघशीत गुण मिळाले आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढणार आहे. अशावेळी आपल्या पुढील शिक्षणासाठी कोणती शाखा योग्य आहे. यासाठी शासनानं एक चांगला पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.


 

 



 

14 ते 23 ह्या कालावधीत घेतलेले निर्णय आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम करतात. त्यातही आपण करिअरच्या दृष्टीने विचार करताना योग्य असा शाखेचा विचार केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. यासाठी शासनानं कल चाचणी ही वेबसाइट तुमच्यासाठी लाँच केली आहे. http://ivgs.ac.in/ आणि http://mahacareermitra.in या वेबसाइटवर तुम्हाला कल चाचणी पाहता येईल.

 

करिअरची नेमकी दिशा ठरविण्यासाठी कल चाचणीची ही वेबसाइट नक्कीच उपयोगी ठरु शकेल. यामध्ये फक्त आपला सीट क्रमांक टाकायाचा आहे. त्यानुसार तुमच्या आवडीची शाखा निवडायची. त्यानंतर त्याबाबत तुम्हाला इत्भूंत माहिती मिळेल.