औरंगाबाद विभागातून बीडची सलग चौथ्यांदा बाजी..!
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2016 02:58 PM (IST)
बीडः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणेच औरंगाबाद विभागातून बीड जिल्ह्याने यंदाही बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागात बीडचा सर्वाधिक 93.90 टक्के एवढा निकाल लागला आहे. बीड जिल्ह्याने विभागातून प्रथम येण्याचा मान सलग चौथ्यांदा मिळवला आहे. बीड जिल्ह्यातून यावर्षी 40 हजार 754 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 38 हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 620 शाळांपैकी 121 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा निकाल 90 टक्क्यांपेक्ष्या जास्त लागला आहे . बीड जिल्ह्याचा तालुकानिहाय निकालः बीड- 95.27 % पाटोदा- 95.80 % आष्टी- 97.09 % वडवणी- 96.05 % गेवराई- 94.98 % शिरूर कासार- 94.40 % केज- 94.02 % धारूर- 93.54 % अंबाजोगाई- 91.57 % परळी- 91.59 % माजलगाव- 88.54 %