मुंबईः रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी आता वाहनांना 'स्पीड गव्हर्नर' बसवण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. राज्यातील 8 ते 9 लाख जुन्या वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविण्यात येणार आहे.

 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रविवारी झालेल्या भीषण अपघातात 17 जणांचा बळी गेला तर 20 जखमी झाले. जखमींची विचारपूस करण्यासाठी दिवाकर रावते कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात गेले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. रस्ते अपघात कसे टाळता येतील यासंदर्भातही तातडीची पाऊल उचलण्यात येणार असल्याचं रावते यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्याः

 

शेडुंगच्या अपघातात एकाच कुटुंबातील आजी, सून, नात मृत्युमुखी