यवतमाळमध्ये एसआरपीएफ जवानांच्या वाहनाला अपघात, 20 जवान जखमी
एबीपी माझा वेब टीम | 20 Oct 2018 04:55 PM (IST)
यवतमाळमध्ये राज्य राखीव दलाचा गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 20 जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
यवतमाळ | यवतमाळमध्ये राज्य राखीव दलाचा गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 20 जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नक्षली बंदोबस्तासाठी हे एसआरपीएफ अर्थातच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान हिंगोलीहून गडचिरोलीला जात होते. मात्र त्यांच्या वाहनाला पुसद तालुक्यातील सांडवा गावाजवळ अपघात झाला आणि 20 जवान गंभीर जखमी झाले. दरम्यान या गाडीमध्ये 35 जवान होते. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.