पालिकेच्या सभेला येऊन सही केल्यानंतर छिंदम लगेच परत निघून गेला. त्याआधी छिंदम पालिकेच्या परिसरात येताच संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींनी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी गोरख दळवींसह सात जणांना ताब्यात घेतलं आहे.
अहमदनगर महापालिकेतील भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याच्याविरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली होती. छिंदमवर हल्ल्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?
शिवजयंतीच्या तोंडावर महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना, छिंदमने शिवराय आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून छिंदमबद्दल संताप व्यक्त केला गेला.
श्रीपाद छिंदम नेमकं काय म्हणाला होता?
अशोक बिडवे – हॅलो साहेब...
श्रीपाद छिंदम – बिडवे, काल माणसं आले नाही बरं का...
अशोक बिडवे – काल किन्नर साहेब बोलले ना तुम्हाला, मी पण त्यांना बोललो होतो.
श्रीपाद छिंदम – पाठवणार आहे, का नाही तेवढं सांग फक्त. बाकी कोणाचं नाव नको सांगू.
अशोक बिडवे – बरं.. बरं.. पाठवतो. हे शिवजयंती होऊ द्या ना साहेब...
श्रीपाद छिंदम – ते गेलं ##$%@##... तू काय शिवाजीच्या ##$%@##?
अशोक बिडवे – अहो साहेब... सकाळी सकाळी चांगलं बोला...
श्रीपाद छिंदम – मग...
अशोक बिडवे – असं बोलतात काय सर.. तुम्हाला बोलतोय ना की माणसं नाहीयेत, शिवजयंती होऊ द्या...
श्रीपाद छिंदम – माझं घरचं काम आहे ते...
अशोक बिडवे – मग तुम्ही नीट बोला ना राव...
श्रीपाद छिंदम – मग एक काम कर ना... शिवजयंतीचा इतका पुळका आहे, तर एक-दोन माणसं वाढून घे ना पालिकेतून...
अशोक बिडवे – माणसं नाहीत म्हणून... पण तुमचं काम केलं नाही का कधी?
श्रीपाद छिंदम – माणसं पाठव, बाकीचं नको सांगू तू....
बातमीचा व्हिडीओ :